मुंबई : ज्या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागलं आहे, त्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाची तारीख अखेर ठरली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्याच निकाल देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळाला होती. त्याचा निकाला आता उद्या लागणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील याविषयी माहिती दिल्याचे लाईव्ह लॉने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकाल देणार आहे.
हे पण वाचा..
10वी ते पदवीधरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मुंबई येथे 5182 पदांची जम्बो भरती सुरु
मन सुन्न करणारी दुर्देवी घटना! मुलाच्या हळदीचा कार्यक्रम पाहिला अन् आईने सोडले प्राण
ग्राहकांना दिलासा! सोने किमतीच्या दरवाढीला ब्रेक, घट होऊन सोनं इथपर्यंत पोहोचलं?
धक्कादायक ! DRDO चा आणखी एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये अडकला
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे” यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. दिल्लीच्या राज्यपालांकडून वारंवार प्रशासकीय कामात हस्तक्षेप केला जात असल्याचं हे प्रकरण आहे, असं ‘लाईव्ह लॉ’ नं म्हटलं आहे.

