जळगाव : बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्री वादळ धडकणार असून याचा परिणाम काही राज्यांवर जाणवणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर जाणवणार आहे. दरम्यान, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, ‘मोचा’ चक्री प्रभाव उत्तर महाराष्ट्रात (जळगाव, धुळे, नंदुरबार) याठिकाणी कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हे वादळ समुद्र किनारी असलेल्या राज्य, जिल्ह्यांतून जाणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
हे पण वाचा..
प्रियकरासोबत लॉजवर जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले, नंतर महिलेसोबत घडलं भयंकर..
भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस थेट नदीत कोसळली, 15 प्रवाशी ठार
राज्यातील सर्वात मोठी बातमी ! दहावी पास बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
नाकाबंदी दरम्यान कार तपासणीसाठी थांबवली : गाडीत नोटांनी भरलेल्या बॅगा पाहून पोलिसांना फुटला घाम..
त्यात राज्यातील मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून ते केरळ, तेलंगणा राज्यात धडकेल, असे संकेत आहेत.जळगाव जिल्ह्यात या दिवसात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, वादळाचा फटका जिल्ह्याला बसणार नाही.
तापमान वाढणार
दरम्यान दोन दिवस तापमानात वाढ होईल. वादळामुळे ढगाळ वातावरण राहील. मात्र, उकाडा कायम राहील. सध्या जून, जुलैमधील दमट वातावरण (पावसाचे) तयार झाले आहे.