पुणे : राज्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येतेय. दरम्यान, पुण्यात अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून करण्यात आल्याची घटना घडलीय. करुणा राधाकिसन काटमोरे ( वय 23 राहणार कात्रज ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी खुनी प्रियकर सचिन राजू शिंदे ( वय ३० राहणार वारजे ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकी घटना काय आहे?
करुणा ही विवाहित असून तिला पाच वर्षाचा मुलगा आहे तर तिचा पती एका हॉटेलमध्ये काम करतो. घरकाम करूनही एका पाळणाघरात ती काम करत असताना सचिन याच्यासोबत तिची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीनंतर पुढे अनैतिक संबंध सुरू झाले.
हे पण वाचा..
भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस थेट नदीत कोसळली, 15 प्रवाशी ठार
राज्यातील सर्वात मोठी बातमी ! दहावी पास बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
नाकाबंदी दरम्यान कार तपासणीसाठी थांबवली : गाडीत नोटांनी भरलेल्या बॅगा पाहून पोलिसांना फुटला घाम..
सचिन हा वेळोवेळी तिला बोलावून घेत लॉजवर घेऊन जात असायचा. दहा तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता पुणे-सातारा रोडवरील शीतल लॉज येथे ते दोघे आले होते त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने करूणा हीच्या गळ्यावर चाकूने वार केले आणि तो फरार झाला. अकरा तारखेला सकाळी कर्मचारी साफसफाई करण्यासाठी आले त्यावेळी करूणा ही मयत अवस्थेत असल्याचे आढळून आले आणि तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस येण्यापूर्वीच आरोपी पसार झालेला होता त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल देखील स्वीच ऑफ करून टाकला मात्र तरीदेखील तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास जुळवत आणला आणि अवघ्या काही तासात त्याला ताब्यात घेतले. करुणा हिचा खून केल्याची कबुली त्याने दिलेली असून या मागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

