पुणे : राज्यात TET घोटाळ्याचे प्रकरण अजूनही संपलेले नसताना त्यातच आता दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून पोलिस तपासात त्यांनी आत्तापर्यंत ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना पैसे घेऊन प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट बेवसाइट बनवली. त्या माध्यमातून तब्बल ८०० जणांना दहावीचे बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले. बनावट प्रमाणपत्र घेणारे ग्राहक शोधण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी या लोकांनी एजंट नेमले होते. एका प्रमाणपत्रासाठी ते ३५ ते ५० हजार रुपये घेत होते.
हे पण वाचा..
नाकाबंदी दरम्यान कार तपासणीसाठी थांबवली : गाडीत नोटांनी भरलेल्या बॅगा पाहून पोलिसांना फुटला घाम..
Health News : रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही ‘या’ गोष्टी खाऊ नका ; अन्यथा..
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ‘ईडी’ची नोटीस ; नेमकं काय आहे प्रकरण?
कसा उघड झाला प्रकार
दहावी, बारावीत नापास झालेल्यांना बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करुन संदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्याने ६० हजार रुपयांमध्ये प्रमाणपत्र मिळेल, असे सांगितले. बनावट ग्राहकाने काही रक्कम त्याला दिली व उर्वरित रक्कम घेण्यासाठी आला असताना पोलिसांनी सापळा रचून पकडले. पोलिसांनी कांबळे यांची चौकशी केली. त्यात कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख व सय्यद इम्रान यांची नावे उघड झाली. त्यांना अटक केली आहे.
दरम्यान, गैरव्यवहारातून पैसा जमा करुन पुढील दाेन वर्षात संभाजीनगर येथे त्यास जमीन घेऊन स्वतंत्र विद्यापीठ स्थापना करायचे होते,अशीही धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

