मुंबई : भारतीय शेअर बाजारात चढ उतार सुरु आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा शेअर बाजारात तेजी आली आहे. सेन्सेक्समध्ये आज 700 हून अधिक अंकांची वाढ दिसून आली आहे. निफ्टीही वाधरली असून निफ्टीने 18200 ची पातळी ओलांडली आहे
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 709 अंकांनी वाढून 61,763.31 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 202 अंकांच्या वाढीसह 18,271 वर बंद झाला. बँकिंग, ऑटो, फायनान्शिअल आणि रियल्टी शेअर्स तेजीत होते.
इंडसइंड बँक शेअर निफ्टीमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक तेजीत होता. तर कोल इंडिया आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 1-1 टक्क्यांची घसरण दिसून आली. याआधी शुक्रवारी देशांतर्गत बाजारात जोरदार विक्री दिसून आली.
आज बँक निफ्टी 622 अंकांच्या म्हणजेच 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 43,284 च्या पातळीवर बंद झाला आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांकही 327 अंकांनी वाढून 1.02 टक्क्यांवर बंद झाला.

