शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सीआयएसएफच्या तैनातीला विरोध होत आहे. शिर्डीतील ग्रामस्थ सीआयएसएफच्या तैनातीला विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत चार विषयांवर अनेकांनी आपापली मते मांडली. या सर्वांची मते विचारात घेऊन 1 मेपासून संपूर्ण शिर्डी गाव बंदची हाक दिली आहे
साईंवर देशातील आणि जगातील करोडो लोकांची श्रद्धा आहे. शिर्डी मंदिर हे साईंचे सर्वात प्रसिद्ध मंदिर मानले जाते. शिर्डीच्या साई मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दान करतात. या मंदिरात येणारी देणगी हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. अशा स्थितीत शिर्डीचे साई मंदिर १ मेपासून बंद करण्याची घोषणा भाविकांना आश्चर्यचकित करणारी आहे.
शिर्डीत १ मेपासून बंदची हाक
साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी CISF तैनात करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. वास्तविक, शिर्डीतील साई मंदिर प्रशासन सीआयएसएफच्या तैनातीला विरोध करत आहे. अहमदनगरच्या शिर्डीत बांधलेले साईबाबांचे हे मंदिर भारताबाहेरही प्रसिद्ध आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक येथे येतात. CISF सर्व औद्योगिक प्रतिष्ठान, मेट्रो स्टेशन आणि विमानतळांचे संरक्षण करते. पण, शिर्डी मंदिरात राहणारे लोक तेथे सीआयएसएफच्या तैनातीमुळे खूश नाहीत.
बुधवारी आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत चार विषयांवर अनेकांनी आपापली मते मांडली. या सर्वांची मते विचारात घेऊन सोमवार 1 मे रोजी संपूर्ण शिर्डी गाव बंद ठेऊन संध्याकाळी 6 वाजता ग्रामसभा घेण्यात येणार आहे. वास्तविक चारपैकी तीन निर्णय हे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या आदेशानंतर पारित झालेले आहे. शिर्डीचे साई समाधी मंदिर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून याठिकाणी उच्च प्रतीची सुरक्षा यंत्रणा असावी या आशयाची जनहित याचिका 2018 मध्ये केलेली आहे.

