नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष ‘म्हणून दर्जा निवडणूक आयोगाने सोमवारी काढून घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेला तृणमूल कॉंग्रेस पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ELECTION COMMISSION OF INDIA आयोगाने काढून घेतला आहे.
आम आदमी पार्टीला ‘राष्ट्रीय पक्षाची मान्यता’…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.दिल्ली, गोवा, पंजाब, गुजरात या चार राज्यांतील निवडणुकांत आप पक्षाने केलेल्या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय राज्य पक्ष म्हणून मान्यता पक्षाचा दर्जा देण्यात आला.
देशात आता ६ राष्ट्रीय पक्ष
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आता देशात भाजप, काँग्रेस, माकप, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आप या सहा पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.
.
या पक्षांचा ‘राज्य पक्ष दर्जा’ ही रद्द
राष्ट्रीय लोक दल (उत्तर प्रदेश), भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश), पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्स (मणिपूर) मध्ये, पट्टली मक्कल काटची (पुडुचेरी), रेव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (प. बंगाल), मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स (मिझोराम).
राष्ट्रवादी कॉंग्रेस व तृणमूल काँग्रेसला अनुक्रमे नागालँड व मेघालय या राज्यांत राज्य पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. या दोन राज्यांत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला.