यावल : यावल तालुक्यातील अट्रावल येथे काल एक मोठी घटना घडली आहे. ती म्हणजे काही समाजकंटकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. यानंतर येथे दोन गटात तुफान दगडफेक करत लाठ्या- काठ्याचा वापर करून, तुंबळ हाणामारी झाल्याने 10 ते 12 जण जखमी झाले. या संदर्भात दोन्ही गटासह शासनाचे वतीने तब्बल २o५ आरोपीं विरुद्ध विविध कलमासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ७० हुन अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.
दाखल फिर्यादीनुसार दि.०१/०४/२०२३ रोजी सकाळी ०९.३०वा. ते १०.३० वा.च्या सुमारास अट्रावल येथील आंबेडकर नगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या जवळ यातील फिर्यादी व इतर साक्षीदार लोक असे उभे असतांना यातील आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन फिर्यादी व साक्षीदार यांना हातात लाठ्या-काठ्या, तलवार, मिरची पावडर घेवुन दगड फेक करुन मारहान करुन हे धेडगे जास्त मातले आहे. अशी जातीवाचक शिवीगाळ करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लाठ्या काठ्यांनी दगडानी तोडुन विटंबना केली.
यानंतर दोन गटात तुफान दगडफेक करत लाठ्या- काठ्याचा वापर करून, तुंबळ हाणामारी झाली होती. यात १० ते १२ जण जखमी झाले होते. या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गटाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एका गटाकडून ५७ तर दुसऱ्या गटाकडून ५१ यासह पोलीस प्रशासनाच्या वतीने फौजदार सुनीता कोळपकर यांनी दिलेल्या फिर्यादीत ९३ व पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ०४ अशा चार फिर्यादीनुसार २०५ आरोपींवर विविध कलमान्वये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचाच..
यंदाचा उन्हाळा ठरणार डोखेदुखी ! नेमका काय आहे हवामान विभागाचा अंदाज??
आता या एक्स्प्रेसला मिळाला भुसावळ स्थानकावर थांबणार
महिलांसाठी ही विशेष योजना 1 एप्रिल पासून झाली सुरु : नेमकी काय आणि कसा लाभ मिळेल?
खळबळजनक! तरुणीने बनवला आपल्याच मैत्रिणीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा व्हिडीओ, अन्…
तर याप्रकरणी ७० हुन हंडीक संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांची धरपकड अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, गावात दंगल विरोधी पथक व पोलीस ताफा मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता गावात तणावपूर्ण शांतता आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला आहे. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये, असे आवाहन पत्रकारांशी बोलतांना फैजपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले आहे .