नवी दिल्ली : तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरटेल थँक्स अॅपद्वारे तुम्ही एअरटेल मोबाइल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंटवर दरमहा 300 रुपये वाचवू शकता. तथापि, दरमहा रु. 300 कॅशबॅक मिळविण्यासाठी, तुमच्याकडे Airtel Axis Bank क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँकेने हे क्रेडिट कार्ड सादर केले होते.
एअरटेल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे. हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते. एअरटेल थँक्स अॅपवर हे क्रेडिट कार्ड वापरल्यास ग्राहकांना अधिक फायदा होईल. याशिवाय हे क्रेडिट कार्ड स्विगी आणि झोमॅटो वरून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी देखील एक उत्तम कार्ड सिद्ध होऊ शकते.
कार्ड वैशिष्ट्ये
Airtel Axis Bank क्रेडिट कार्ड जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत कार्ड अॅक्टिव्हेशनवर ग्राहकांना 500 रुपयांचे Amazon व्हाउचर दिले जाईल.
Airtel Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे Airtel Mobile/DTH रिचार्ज, ब्रॉडबँड आणि Airtel Thanks अॅपवर Wi-Fi पेमेंटवर 25% कॅशबॅक मिळेल. (एका महिन्यात जास्तीत जास्त रु.300 कॅशबॅक)
ग्राहकांना एअरटेल ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे एअरटेल थँक्स अॅपद्वारे वीज, गॅस किंवा पाणी बिल पेमेंटवर 10% कॅशबॅक मिळेल. (एका महिन्यात जास्तीत जास्त रु.300 कॅशबॅक)
Airtel Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना Swiggy, Zomato आणि Bigbasket वर खर्च केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.
क्रेडिट कार्ड धारकांना इतर सर्व खर्चांवर 1% कॅशबॅक मिळेल.