Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Fake companies ; ११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून एकास अटक

najarkaid live by najarkaid live
April 2, 2023
in Uncategorized
0
GST Pune news ; वस्तू व सेवाकर विभागाची पुण्यात मोठी कारवाई
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई दि 1:-  सामान्य नागरिकांच्या पॅन व आधार कार्डाद्वारे ११९ Fake companies तयार करण्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला राजस्थान येथील jaypur येथून अटक करण्यात आली. राज्यकर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकाने जयपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

मयुर नागपाल हा बेनामी पद्धतीने e-mail तयार करत असल्याचे आढळून आले. बेनामी ई-मेल आणि Fake companies, त्याचा थेट संबंध दिसून आले. Maharastra state  GST Act कायद्याच्या कलम 132 अन्वये हा गुन्हा ठरत असल्याने त्यास अटक करण्यात आली. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी, मुंबई यांनी आरोपीस 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

मे. माही एंटरप्रायजेस या कंपनीच्या bhiwandi आणि nashik येथील पत्यावर छापे टाकण्यात आले.  तेथे कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. या कंपनीने जवळपास 22 कोटींच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा  फायदा घेतल्याचे दिसून आले. त्याचबरोबर, मे. माही एंटरप्रायजेस आणि या कंपनीसोबत व्यवहार दाखविणाऱ्या कंपन्या यांच्या ई-मेल व मोबाईल नंबरमध्ये काही सामाईक दुवे सापडले.

याप्रकरणी सायबर फॉरेन्सिक तज्ञांचीही मदत घेण्यात आली. पुढील तपासासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्ली व नोएडाला जाऊन आले. राष्ट्रीयकृत बॅंका, UPI  gateway, आणि दूरसंचार सेवा देणाऱ्या संस्थांकडून माहिती गोळा करण्यात आली. राज्यकर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकाने आणि जयपूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला शोधून काढले.

जयपूरमधल्या एका बंगल्यातल्या तळघरातून आरोपी हे बेकायदेशीर काम करत असल्याचे आढळून आले. त्याचा जबाब नोंदविण्यात आला. याप्रकारे तयार केलेल्या खोट्या कंपन्यांची संख्या पुढील तपासात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.करचुकवेगिरी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधातील राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या प्रयत्नांना या कारवाईमुळे मोठे यश मिळाले आहे.

या प्रकरणाचा तपास, अन्वेषण-ब विभागाच्या प्रमुख व राज्यकर सहआयुक्त श्रीम. वान्मथी सी.( भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यकर उपायुक्त श्रीम. रुपाली बारकुंड यांच्या प्रत्यक्ष सहभाग व देखरेखीखाली करण्यात आला. तपास अधिकारी व सहायक राज्यकर आयुक्त डॉ. ऋषिकेश वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. सर्व सहायक आयुक्त, सर्वश्री- दिपक दांगट, रामचंद्र मेश्राम व सुजीत पाटील यांनी तपासात सहाय्य केले. अन्वेषण शाखेच्या राज्यकर निरीक्षकांनी यात मोठे योगदान दिले.

आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये ,maharastra state GST विभागाने केलेली ही 73 वी अटक आहे. हे प्रकरणाचा तपास महाराष्ट्र शासन तसेच उत्तर प्रदेश व राजस्थान शासनाच्या यंत्रणांशी यशस्वीपणे समन्वय साधून करण्यात आला. यातील लाभलेले यश हे ‘एक राष्ट्र, एक कर, एक बाजार’ या संकल्पनेसंदर्भात उत्तम उदाहरण असल्याचे राज्य वस्तू व सेवा कर विभागाने नमूद केले आहे.

Spread the love
Tags: #maharastra state #GST#Fake companies
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्ही Airtel चे ग्राहक आहात का? मग दर महिन्याला रिचार्जवर असे वाचवू शकतात 300 रुपये?

Next Post

प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नर्सरी उभारून केली ५० लाखांची रोपविक्री

Related Posts

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

April 1, 2025
धरणगाव नगर परिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

धरणगाव नगर परिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

April 1, 2025
Next Post
प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नर्सरी उभारून केली ५० लाखांची रोपविक्री

प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नर्सरी उभारून केली ५० लाखांची रोपविक्री

ताज्या बातम्या

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us