नवी दिल्ली : देशात 2023-24 हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यासोबतच काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. 1 एप्रिल 2023 पासून देशात अनेक नियम बदलले आहेत. यातील काही नियमांचा लोकांना फायदा होणार आहे, तर काही नियमांचा लोकांच्या खिशावरही परिणाम होणार आहे. या नियमांचा देशातील जनतेवर मोठा परिणाम होणार आहे. प्राप्तिकरापासून टोल आणि सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीपर्यंत अनेक बदल झाले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…
भारतीय रेल्वे जुनी पेन्शन योजना
7 वा वेतन आयोग PPF योजना अपडेट
सोन्याचा आजचा भाव नितीन गडकरी टोल टॅक्स
हे बदल १ एप्रिल २०२३ पासून झाले आहेत.
नवीन कर व्यवस्था डीफॉल्ट पर्याय बनली.
– 87A अंतर्गत सूट वाढून 25,000 रुपये झाली.
– नव्या करप्रणालीत वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही.
– सेवानिवृत्तीवर रजा रोखीकरणाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे.
– डेट म्युच्युअल फंडांवर LTCG लाभ नाही.
NSE व्यवहार शुल्कात 6% वाढ मागे घेणार आहे.
5 लाख वार्षिक प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसींवर कर आकारला जाईल.
2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त EPFO योगदानावर कर आकारला जाईल.
– 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेच्या व्यवहारांवर कॅपिटल गेन टॅक्स लावला जाईल.
ऑनलाइन गेमिंग बक्षिसावर TDS लागू होईल.
– विमा कंपन्यांचे कमिशन ईओएम अंतर्गत असेल.
हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये 6-अंकी HUID असणे आवश्यक आहे.
एक्स-रे मशीनची आयात १५ टक्के महागणार आहे.
हे पण वाचा..
आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाला इतक्या रुपयांनी स्वस्त..
8वी, 10वी पाससाठी खुशखबर.. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव इथे मोठी भरती
Video : पंचायत समिती समोर सरपंचाने चक्क दोन लाख रुपये उधळले; नेमकं कशासाठी?
अत्यावश्यक औषधे 12 टक्के महाग होतील.
– सिगारेट, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ महागणार.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १८ टक्के जास्त टोल भरावा लागणार आहे.
2,000 रुपयांवरील सर्व UPI व्यवहारांवर आता व्यापाऱ्याकडून 1.1% इंटरऑपरेबिलिटी शुल्क आकारले जाईल. UPI पेमेंटवर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही.
– व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी झाली.
नवीन कर प्रणालीमध्ये मानक वजावट उपलब्ध असेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील ठेवीची कमाल मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. मासिक उत्पन्न योजनेसाठी, एकल खात्यातील रक्कम 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यांसाठी 7.5 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे.