फुलंब्री : सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत एका सरपंचाने 2 लाख रुपये समितीच्या कार्यालयासमोर उधळले. हा सर्वप्रकार फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालयासमोर घडला. याबाबत व्हिडीओ zee 24 taas या मराठी वृताने प्रसारित केला आहे.
गावामध्ये विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत, गावाच्या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांच्या बंडालाचा हार गळ्यात घालून थेट फुलंब्रीचे पंचायत समिती कार्यालय गाठले आणि पैशांची उधळण केली. मंगेश साबळे असं या सरपंचाचे नाव असून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत.
विहिरीसाठी लाच मागितलि म्हणून चक्क दोन लाख रुपये पंचायत समिती समोर उडवत सरपंचाने आंदोलन केले आहे. पाहा व्हिडिओ #marathinews #Well #bribe #marathinews #zee24taas pic.twitter.com/mwqSiqHCZo
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 31, 2023
व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती गळ्यात पंशाची माळ घालून आलेला आहे. तो सरकार आणि प्रशासनाचा निशेष करतो आहे. काही अधिकाऱ्यांची नावे घेतो आहे. तसेच गळ्यातील माळेत असलेले पैसे उधळतो आहे. या घटनेचा व्हिडिओ सशल मीडियावर व्हायरल झाला आहे.