पाचोरा : पाचोरा तालुक्यात नगरदेवळा येथील पिता-पुत्रासोबत भयंकर घटना घडलीय. कामावरुन घरी परतणाऱ्या पिता-पुत्रावर मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढवला. यात या हल्ल्यामध्ये पित्याचा मृत्यू झाला असून जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शिंदोली येथे घडली आहे.
काय आहे घटना?
सैय्यद सबदर सैयद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सैय्यद सबदर हे दोघे ३१ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास रोजंदारी चे काम करून परतत असतांना शिंदोळ गावाजवळ आगी मोहळच्या मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल (वय – ५८) यांच्या तोंडाला मधमाशा चावल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हे पण वाचा..
अत्यंत महत्वाची बातमी! आजपासून मोदी सरकारने केले देशात हे 20 मोठे बदल, काय आहेत घ्या जाणून
आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाला इतक्या रुपयांनी स्वस्त..
8वी, 10वी पाससाठी खुशखबर.. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव इथे मोठी भरती
Video : पंचायत समिती समोर सरपंचाने चक्क दोन लाख रुपये उधळले; नेमकं कशासाठी?
तर मुलगा आबीद सैयद सबदर यालाही माशांनी चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. सैय्यद इस्माईल हे मजुरी करून आपला आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. मयत सैय्यद इस्माईल यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून त्यांच्या परिवारास आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.