आष्टी : महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की आजही प्रचंड गर्दीचा माहोल असतो. यात तिच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे. तरुणांना तर गौतमी पाटीलच भलतंच वेड असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. गौतमी पाटीलचा अनेकांनी विरोध देखील केला. आता यात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची भर पडली आहे.
गौतमी पाटीलचं उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी टीका केली आहे. गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलं आहे. आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
हे पण वाचा
२५ वर्षीय अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या ; पोलीस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर
कंपनीतून हाफ डे घेऊन गावी जाण्यासाठी निघाले, पण रस्त्यातच काळाने झडप घातली ;दोन मित्रांचा मृत्यू
Jalgaon Crime News ; जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाचा खून !
आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नाही. असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटले आहे.