पुण्यात तीन दिवसापूर्वी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. भेटी नंतर नाना पाटेकर यांनी मीडिया प्रतिनिधीशी बातचीत केली असतांनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतांना दिसत असून अजितदादा पवार व नाना पाटेकर यांना चाहणारा वर्ग या खूप पसंती देत आहेत.
https://www.instagram.com/p/CZBrK9UFtoy/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडीओ मध्ये नाना पाटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे की अजित पवार हे खरोखरच एक चांगले नेते आहेत. अजित पवार खूप काम करतात, पण जाहिरात करत नाहीत,’ असं नाना पाटेकर म्हणाले.
पुण्यातील विधानभवनात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा करोना आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीपूर्वी नानांनी अजितदादांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. आम्हाला जास्त प्रसिद्धी मिळते. अजित पवार हे इमानाने गुपचूप काम करत राहतात. जाहिरात करत नाहीत. एखादी कुठली गोष्टी चुकली की मीडिया लगेच ते अधोरेखित करतो. पण अजित पवारांनी केलेलं काम लोकांसमोर आणा, असं आवाहन नाना पाटेकर यांनी माध्यमांना केलं.