जळगाव । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून यातच जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. १८ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर दोन वर्षांपासून अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचे गर्भपात करून लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील एका भागात १८ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एरंडोल शहरातील इस्लामपूरा भागात राहणारा हसन असलम मोमीन याची पिडीत मुलीशी ओळख झाली, त्यावेळी ती अल्पवयीन होती. ओळखीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्या इच्छेविरूध्द तिच्या अमानुष अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणी गर्भवती राहिली.
हे पण वाचा..
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ‘एवढे’ सानुग्रह अनुदान
भररस्त्यात नगरसेवकाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
शेतकऱ्यांनो सावधान..! हवामान खात्याकडून गारपिटीसह पावसाचा अंदाज ; जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी
महाराष्ट्र एक्सप्रेससह १० रेल्वे गाड्या रद्द, इतर गाड्यांच्या मार्गातही बदल ; जाणून घ्या सविस्तर…
कॉफी आणि पपई खाऊ घालून केला गर्भपात
पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर संशयित आरोपी हसन असलम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि असलम मोमीन या तिघांनी गर्भपात करण्यासाठी कॉफी आणि पपई खाऊ घातली. यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची तारीख निश्चीत केली. परंतू लग्नाच्या वेळी हजर झाले नाही व फसवणूक केली. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने रविवारी १२ मार्च रोजी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी हसन असलम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि असलम मोमीन या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.