जळगाव,(प्रतिनिधी)- भुसावळ मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड- दौंड विभागातील बेलापूर चितळी, पुणतांबा दुहेरी मार्गावरिल मोल्डिंगचे सुरु होणाऱ्या कामांमुळे दिनांक २२ व २३ मार्चला रेल्वे प्रशासनाने ब्लॉक जाहिर केला आहे याचा थेट परिणामामुळे या मार्गावरील महाराष्ट्र एक्सप्रेससह तब्बल १० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून १२ रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
या ट्रेन रद्द…
ट्रेन क्र. ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही २१ व २२ या दिवशी कोल्हापूरहून सुटणारी गाडी आणि क्र. ११०४० गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी २२ व २३ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.नांदेड-पुणे एक्स्प्रेस २१ व २२ मार्च, पुणे- नादेड एक्सप्रेस २२ व २३ मार्च, ११०४२ दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस २१ व २२ मार्च, ११०४२ साईनगर शिर्डी- दादर,
२२ व २३ मार्च रोजी गोंदियाहून सुटणारी दादर एक्स्प्रेस, नागपूर- पुणे एक्स्प्रेस ही २१ मार्च रोजी नागपूरहून सुटणारी गाडी, पुणे- नागपूर एक्स्प्रेस ही २२ मार्च रोजी पुण्याहून सुटणारी गाडी, तसेच नागपूर- पुणे एक्स्प्रेस ही २२ मार्च रोजी नागपूरहून सुटणारी गाडी, पुणे- नागपूर एक्स्प्रेस ही २३ मार्चला पुण्यातून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.तसेच इतर १२ रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे.

