राज्यात कांद्यावरून चांगलाच वादंग सुरु आहे. भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कवळीमोल भावात कांदा विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यादरम्यान,सोलापुरातही एका शेतकऱ्याने रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेल्या ५१२ किलो कांद्याच्या बदल्यात अवघ्या दोन रुपयांचा धनादेश मिळाला.राजेंद्र तुकाराम चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
नामदेव लटपटे यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा, 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करून अहमदनगर येथील बाजार समितीत असलेल्या, संतोष लहानु सूर्यवंशी यांच्या आडतवर नेऊन विकला. यादरम्यान त्यांना खर्च वजा करून 17 कांद्याच्या गोण्यांची पट्टी निव्वळ शिल्लक रक्कम 1 रुपया मिळाली आहे. यामुळं थट्टाचं झाल्याने शेतकरी नामदेव लटपटे हवालदिल झाले आहेत.
तर याविषयी शेतकरी नामदेव लटपटे यांच्या पत्नी मनीषा लटपटे म्हणाल्या, की या कांद्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलीय. दोन पैसे मिळतील असं वाटलं होतं. कुटुंब चालेल मुलांचे शिक्षण होईल असं वाटलं होतं. मात्र 17 गोणी कांद्याचे फक्त एक रुपये आलाय.
हे पण वाचा…
Vidoe ! भाजप आमदाराचा मुलगा लाखो रुपयांची लाच घेताना जाळ्यात ; ऑफिस, घरातून जप्त केले 7.7 कोटी रुपये
सर्वसामान्यांना मोठा दिलासा : या औषधांच्या किमती केल्या कमी
हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे उचललं ‘हे’ मोठं पाऊल ; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
पुढचे चार दिवस महत्वाचे: राज्यातील या भागात मुसळधारचा इशारा
त्यामुळे या कांद्यासाठी मजुरी करणाऱ्या महिलांचे 10 हजार रुपये बाकी असलेले द्यावे कुठून ? मुलांचे शिक्षण कसं करावं ? परीक्षेची फीस कुठून भरावी ? कुटुंब कसं चालवावं ? आता मायबाप सरकार तुम्हीच सांगा जगायचं कसं ? असे एक ना अनेक प्रश्न नामदेव लटपटे यांच्या पत्नीने सरकारला विचारलेत.

