मुंबई : राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका आणि झळा वाढत असून, उकाड्यातही वाढ होत आहे.सातत्याने वातावरणामध्ये बदल होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी असून राज्यावर आस्मानी संकटाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे.
याशिवाय सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या सरी पडू शकतात. मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले, तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. याचा प्रभाव विदर्भात मात्र वाढू शकतो.
हे पण वाचा…
महाराष्ट्र वन विभागात ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. 127 पदांसाठी भरती सुरु
जळगाव येथील रेमंड कंपनीसंदर्भात कामगार हिताचा निर्णय घेणार – कामगार मंत्री सुरेश खाडे
अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका ; आता स्थिती कशी आहे ते जाणून घ्या
विदर्भातही पावसाची शक्यता
दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथेही मेघगर्जनेसह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारसाठी विदर्भात पिवळ्या रंगातील इशारा म्हणजे वातावरणाकडे लक्ष ठेवून राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

