मुंबई : आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशावेळीच उद्धव ठाकरे यांना त्यांना शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी दिलीय. आगामी काळात ग्रामीण भागातून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली पाहिजे, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी अंधारे यांच्याकडून व्यक्त केलीय.
दरम्यान, यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी भाजपला इशारा दिलाय. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. त्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत आलो असल्याचं अंधारे यांनी सांगितलं. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. पण मी त्यातील नाही. ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मला पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाही. फक्त देशाचं संविधान वाचवण्यासाठी मला भाजपविरोधात लढाचं आहे. माझं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं जेव्हा उद्धव टाकरे म्हणाले तेव्हाच तळागाळात विचार गेला.
हे पण वाचा :
लैंगिक गैरवर्तन, मिठी मारण्यासह आता चुंबनावरही बंधने ; मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी
4 मुलांची आई 14 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली, दोघेही प्रेमात घर सोडून बेपत्ता; मग…
50 कोटींहून अधिक रोख, 3 सोन्याच्या विटा; अर्पिताच्या फ्लॅटमधून आतापर्यंत काय मिळाले?
महाराष्ट्र हादरला ; पैशांचे आमिष दाखवून ११ वर्षीय बालिकेवर नऊ जणांचा वारंवार बलात्कार
त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलं. माझ्या डोक्यावर ईडीचं ओझं नाही. मी कुठल्या लोभापाई आले नाही. नीलमताई माझ्या पाठीशी आहेत. माझ्याकडून चुकीचं काही होणार नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. त्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत आलो असल्याचं अंधारे यांनी सांगितलं. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करुन संविधानिक चौकट मोडली जात आहे, असा आरोपही अंधारे यांनी केलाय.