पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावला असून कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला आहे.
पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या २१ व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचा अपवाद वगळता प्रत्येक फेरीत धंगेकर रासनेंना वरचढ ठरले. रवींद्र धंगेकर यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन त्यांना भरघोस मतदान केलं. सरतेशेवटी महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना ११ हजार मतांनी पराभवाची धूळ चारत विधानसभेत पाऊल ठेवलं आहे.
हे पण वाचा.
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! बँक उघडण्याची-बंद होण्याची वेळ बदलणार?
जळगाव: यूट्यूब पाहून बनावट नोटा छापणे शिकला, पण.. हमालाची कमाल पाहून पोलिसही चक्रावले
भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक ; VIDEO समोर
मोठी बातमी: देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमक काय आहे प्रकरण?
कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. धंगेकरांनी भाजपच्या रासनेंसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पुण्यातील १०० पेक्षा जास्त माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौज आधीच हेमंत रासने यांच्यासाठी कामाला लागली होती. पण धंगेकारांचा झंझावात पाहता यांचा टिकाव लागत नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाच ते सहा मंत्री कसब्यात तळ ठोकून होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील शेवटचे सहा दिवस कसब्यातच होते. इतकंच काय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसब्यात घर घेऊन ते प्रत्येक अपडेटवर जातीने लक्ष ठेऊन होते
तरी पण रासनेंना धूळ चारत रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. पश्चिम भागातील मतदारांना आकर्षित करण्यात हेमंत रासने अपयशी ठरले. शिवाय पूर्व भागावर संपूर्ण फोकस करुनही जनतेने रासने यांना साथ दिली नाही. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.