जळगाव,(प्रतिनिधी)- प्रगती विद्या मंदिर जळगाव व नूतन मराठा अध्यापक विद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरवासिता उपक्रमांतर्गत मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगती विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा फेगडे ह्या होत्या तर प्रमुख ‘अतिथी म्हणून स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शक श्री. संजय न्याहळदे सर हे होते.प्रसंगी मंचावर आंतरवासिता प्रमुख प्रा.संजय नन्नवरे, आंतरवासिता समन्वयक सौ. अविदिप पवार, बालवाडी विभाग प्रमुख सौ. ज्योती कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुखांच्या शुभहस्ते कविवर्य, मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक वि.वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.
प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिना निमित्त मनोगत व्यक्त केले. आंतरवासिता गटातील छात्राध्यापिका कोमल भदाणे, ललिता बोरोले, यांनी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती सांगितली.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहूणे श्री. संजय न्याहळदे यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धा परीक्षेत कमी वेळेत गणित कसे सोडवावे याविषयीच्या सोप्या पद्धती उदाहरणासह स्पष्ट करून सांगितल्या.त्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
अध्यक्षिय भाषणात मुख्याध्यापिका सौ.शोभा फेगडे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व व त्यासाठी शारीरिक व मानसिकरित्या करावयाची तयारी या विषयी अनमोल मार्गदर्शन केले.
प्रसंगी शाळेतील, बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक बंधू, भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील सर्व वर्गांचे विद्यार्थी, आंतरवासिता गटातील छात्राध्यापक व छात्राध्यापिका उपस्थित होते.