कुत्रा नेहमीच आपल्या मालकाचे रक्षण करतो. असाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. यामध्ये एका व्यक्तीने सापाला मारण्यासाठी कुत्र्याला त्याच्यावर सोडलं आहे.
व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक कुत्रा आणि साप या दोघांची तुफान हाणामारी पाहायला मिळत आहे. साप आणि कुत्रा दोघेही एकमेकांवर तुटून पडलेत. दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ पाहून अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सुरुवातीला साप समोर येतो. कुत्रा सापाला पाहून त्याच्यावर जोरजोरात भुंकू लागतो. कुत्र्याच्या भुंकन्याने साप खूप घाबरतो. आपला जीव वाचवण्यासाठी तो फणा काढतो.
The snake could’ve walked imo. Never fight with who’s not in your weight class.
pic.twitter.com/cSEnx0U4Lq— 🧑🏾💻 𝒓𝒐𝒏𝒂𝒍𝒅 (@iDumeby) January 20, 2023
कुत्रा त्याच्या भोवती फिरत भुंकत असतो. तितक्यात साप त्याला दंश करतो. साप पुढे येताच कुत्रा मागे पाळतो. नंतर तो पुन्हा सापावर भुंकूलागतो. सापाच्या दांशाने कुत्रा आणखी पिसाळतो. सापाने दोन तीन वेळा दंश केल्यावर कुत्रा खूप चिडतो आणि सापाचा चांगलाच चावा घेतो. तो सापाला आपल्या दातांनी पकडुन ठेवतो. साप अगदी तरफडतो आणि कुत्र्याला दंश करत राहतो.
साप आणि कुत्र्याच्या जुगलबंदीचा हा व्हिडिओ रोनाल्ड या युजरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. सध्या हा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.

