पुणे : अलीकडे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची फसवणूक करत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका तेवीस वर्षीय तरुणीला लग्नाची स्वप्न दाखवत वारंवार तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आलीय. पीडित मुलीने आपण लग्न कधी करणार असे विचारल्यावर लग्नास नाकार दिल्याने तरुणीने फसवणूक करणाऱ्या प्रियकराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रियकराला बेड्या ठोकल्या.
नेमकी काय आहे घटना?
या घटनेबाबत अधिक माहिती अशी – मुलीच्या घराजवळच मुलाचे परिचित राहायचे. त्या परिचिताच्या घरी मुलगा यायचा. एक दिवस अचानक त्याची शेजारी राहणा-या एका मुलीवर नजर पडली. पहिल्या नजरेत प्रेम झाले. मुलाच्या चकरा वाढल्या. दोघांचे प्रेम बहरत गेले.
दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र आधी लग्नाला हो म्हणून लाडाई गोडाई करणारा प्रेमवीर अचानक बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे कळताच मुलीने मालेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली व ऐन व्हॅलेंटाईन डेलाच मजनू गजाआड झाला.
हे पण वाचा..
आता पालघरमध्ये ‘श्रद्धा’सारखी हत्या, प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला आणि मग…
शिंदे सरकारचा मोठा निर्णय ; धान लागवडीसाठी शेतकऱ्यांना देणार १५ हजार रुपये
दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट ; विद्यार्थ्यांनो काय आहे आताच घ्या जाणून
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
अंकित सोयाम असे प्रेमवीराचे नाव आहे. तो वणी तालुक्यातील गणेशपूर येथील रहिवासी आहे. चार वर्षाचे प्रेम अचानक तुटल्याने मुलीला धक्का बसला. तिने ही घटना आपल्या आई वडिलांना सांगितली. त्यानंतर मुलीसह पालकांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी अंकित सोयाम विरुद्ध (भादंविच्या कलम 376, 376 (3), 506) गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे.