मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय झाले यावर एक नजर टाकूया.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
>> राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार
>> धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.यासाठी १ हजार कोटी निधीस मान्यता देण्यात आली आहे. ५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार.
>> महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता दिली आहे. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होणार.
>> पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता दिली आहे. यामुळे ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
हे पण वाचा..
केंद्र सरकारची ‘ती’ योजना महाराष्ट्रात लागू करणार ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
सोने 65,000, तर चांदी 80,000 रुपयाचा टप्पा गाठणार? काय आहे आजचे नवे दर
जगासमोर नवं संकट ! कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरसची एन्ट्री, जागतिक आरोग्य संघटनेने बोलावली बैठक
वर्गातच प्रोपज करायला गेला, पुढे मुलीने काय केलं पहा व्हिडीओ
>> पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण . छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा. जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा.सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा.
>> राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव.

