चोपडा | चोपडा शहरातील मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर मध्यरात्री शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये गौरव सुरेश राखेचा (वय ३०) या तरुणाचा गुदमरूमन मृत्यू झाला. तर ६ जणांना या भीषण आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
दरम्यान रात्री आग विझवताना नगरपालिकेचे दोन ते तीन कर्मचारी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रात्रीची वेळ असल्याने सदर घटना लवकर लक्षात न आल्याने मदत लवकर पोहचू शकली नाही. अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली असल्याचे समजते आहे.
आग इतकी भयंकर होती की,आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाला दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरून खिडकीच्या बाहेर येत होत्या आगीची माहिती मिळताच पोलीस. नगर पालिका प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी चोपडा, अमळनेर, धरणगाव, यावल, शिरपूर, जळगांव येथील अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली होती.
जळगाव : संपूर्ण कुटंब झोपेत, मध्यरात्री भीषण आग, तरूणाचा बाथरुममध्ये गुदमरून करुण अंत; एका क्षणात राखेचा कुटुंब उद्धवस्त pic.twitter.com/LhnlMLwpcx
— Maharashtra Times (@mataonline) February 11, 2023
नगर पालिकेचे फायर विभागाचे कर्मचारी व शहरातील तरुण यांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम केले. यात घरात अडकलेल्या पाच वर्षीय चिमुकलीसह सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र गौरव हा जीव वाचवण्यासाठी इतरत्र जागा शोधण्याच्या नादात बेडरूम मधून बाथरूम मध्ये थांबला. तिथेच त्याचा घात झाला. सकाळी सहा वाजता बाथरूममध्ये जळालेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. दरम्यान बेडरूम मध्येच तो राहिला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.

