जळगाव,(प्रतिनिधी)- रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सांची महिला मंडळाच्यावतीने संभाजी नगरातील झाकीर हुसेन कॉलनीत अभिवादन सभा सभेचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते . व्यासपीठावर प्रमुख अतिथी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , बि.जि. बोदडे , सुभाष साळुंखे यांच्यासह आयोजक सांची महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाता इंगळे या होत्या .
कार्यक्रमाच्या प्रारंभी बुद्धवंदना करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले व उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मुकुंद सपकाळे यांनी रमाई आंबेडकर यांच्या जिवन संघर्षावर व प्रकाश टाकत त्यांच्या व बाबासाहेबांच्या अनेक आठवणी सांगितल्या . तसेच रमाईंचा त्याग स्त्रियांसाठी प्रेरणादायी असुन समस्त समाज त्यांच्या ऋणात आहे असे प्रतिपादन त्यांनी केले . ग्रामसेवक शिरतुरे आप्पा यांनीही मनोगत व मिराबाई बाविस्कर , सपना तायडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन रमेश सोनवणे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साची महिला मंडळाच्या कुसुम सोनवणे , माया मोरे , वैशाली सुरवाडे , रेखा भालेराव , रंजना सुरदास , शीला सुरवाडे , आशा सोनवणे , प्रज्ञा जाधव यांनी परिश्रम घेतले .

