बुलडाणा : शिवसेनेते फूट पाडल्यानंतर शिंदे गटाने आपला मोर्चा इतर पक्षांकडे वळवला आहे. विविध पक्षातून अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता शिंदे गटाने बुलडाण्यात काँग्रेसला सुरुंग लावलं आहे. येथील बुलडाण्यात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या 8 नगरसेवकांचा जाहीर सत्कार आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
मोताळा आठवडी बाजार येथील मैदानावर जाहीर सभेत काँग्रेसच्या 8 नगरसेवकांनी जाहीर प्रवेश केला. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे धीरज लिंगाडे निवडून आले. त्याचा आनंद साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस मोठा धक्का बसला आहे. कारण जिल्ह्यातीलच मोताळा येथील नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय.
हे पण वाचा..
नवीन कराच्या स्लॅबमुळे ज्येष्ठ नागरिकांना किती कर भरावा लागेल? जाणून घ्या तपशील
आज या 4 राशींना मिळणार गुडन्यूज ! प्रेयसीसोबत वेळ घालवाल, लव्ह लाईफ मजेत जाईल
सुके बदाम खाणे योग्य की भिजवलेले? जाणून घ्या खरा फायदा काय..
आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. नगरपंचायतमध्ये लवकरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सत्ता स्थापन करून आपण शहराच्या विकासाला चालना देऊ, असे आश्वासन आमदार गायकवाड यांनी दिले.