मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार, नगरसेवक, पदाधिकारी अशा अनेकांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. अशातच शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मोठं खिंडार पडलं आहे.
नवी मुंबईतील २ माजी नगरसेवकांसह १० तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष, नगरसेवक अशोक गावडे, नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्यासह 150 ते 200 पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत.त्यामुळे नवी मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.
हे पण वाचा :
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..
अंधश्रद्धेचा कळस : मुलबाळ होत नाही म्हणून उच्च शिक्षित सुनेसोबत सासच्या मंडळींनी काय केलं पहा
स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक नजन पाटील सांभाळणार
नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडेंसह तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे. एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. दरम्यान, अशातच अशोक गावडेंनी पक्ष सोडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला आता आणखी एक फटका बसला आहे.