मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी राज्य कर्मचाऱ्यांनी सहा महिने संप पुकारला होता. आर्थिक अडचणींमुळे संप काळात 124 हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली होती.आता या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
या संप काळात आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी देण्याचा हा राज्य शासनाचा निर्णय निश्चितच त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी दिलासा देणारा राहणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबर 2021 पासून संप पुकारला होता. हा संप मुंबईच्या आझाद मैदानावर जवळपास सहा महिने सुरू होता. हा संप महामंडळाचे शासनात विलीनीकरण केले जावे या प्रमुख मागणीसाठी करण्यात आला होता. त्यावेळी हा संप महामंडळाला मोडीत काढण्यास अपयश आलं होतं. यामुळे मार्च 2022 मध्ये न्यायालयाने याबाबत हस्तक्षेप केला होता. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा संप मोडीत निघाला.
हे पण वाचा..
10वी, 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय
पती अश्लील व्हिडिओ दाखवून करत होता पत्नीवर अनैसर्गिक कृत्य, अखेर महिलेने.. जळगावातील घटना
अवकाशात दुर्मिळ चित्र दिसून आल्याने जळगावकरांमध्ये खळबळ! पहा व्हिडिओ
संप मोडीत निघाला असला तरीदेखील या एसटी कर्मचाऱ्यांची महामंडळ शासनात विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नाही. मात्र असे असले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात थोडी वाढ झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 5 हजार, 4000 आणि अडीच हजार एवढी वाढ मात्र सरकारकडून करण्यात आली. या संप काळात मात्र महामंडळा समवेतच कर्मचाऱ्यांचे आर्थिक बचत कोलमडले होते. यामुळे संप काळात 124 कर्मचाऱ्यांनी आपलं जीवन संपवलं होतं. दरम्यान आता या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी देण्याचा शासनाचा हा निर्णय सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.