जळगाव :जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पतीने अश्लील व्हिडिओ दाखवून तब्बल वर्षभर पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत पत्नीच्या तक्रारीनंतर विकृत पतीविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, शहरातील एका परीसरात ३० वर्षीय महिला ही पतीसह वास्तव्यास आहे. मागील वर्षभरापासून महिलेचा पती हा तिच्यासोबत वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करीत होता. या कृत्याला महिलेने विरोध केला असता तिला शिविगाळ मारहाण करण्यात आली आणि मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली.
त्यानंतर अश्लील व्हिडिओ दाखवून पतीने महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य केले. हा त्रास असह्य झाल्यानंतर महिलेने संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर बुधवारी शनिपेठ पोलिसात धाव घेत विकृत पती विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.