नवी दिल्ली : शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याने पुन्हा एकदा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचा भाव 1000 रुपयांनी वधारला होता. आज
आज गुरुवारी व्यवहार सुरू होताच, सोने 58,826 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले, जे आता 58,700 रुपयांवर व्यवहार करत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ होत आहे. चांदी 71,500 रुपये प्रति किलो या 11 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.
देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि देशांतर्गत मागणी यामुळे सोन्याच्या किमतीत गेल्या 4 महिन्यांत 9000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढ झाली आहे. सन 2023 मध्ये गेल्या एका महिन्यातच सोन्याच्या किमतीत 4000 रुपयांनी वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरातील वाढीचा संबंध अमेरिकन सेंट्रल बँक फेड रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या वाढीशी जोडला जात आहे. चलनवाढ रोखण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हने अमेरिकेतील व्याजदर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवले आहेत. दुसरीकडे, कोरोनाच्या निर्बंधांमध्ये दिलेल्या शिथिलतेमुळे सोन्याच्या मागणीत वाढ दिसून येते, त्यामुळे सोन्याची चमक कायम राहू शकते.
हे पण वाचा..
आजचे राशिभविष्य – व्यावसायिक यश मिळेल, पैशाची आवक वाढेल
अर्थमंत्र्यांनी केली पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा, काय आहे आताच घ्या जाणून
कोथिंबीरच्या सेवनाचे हे फायदे तुम्हाला नसेल माहिती ; जाणून व्हाल चकित
जागतिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याच्या दरातील वाढ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता आहे. मंदी, चलनवाढ आणि क्रिप्टो मालमत्तेची मागणी नसल्यामुळे सोन्याचे भावही वाढत आहेत. येत्या काही दिवसांत सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
जळगावातील दर
सध्या जळगावात 22 कॅरेट सोन्याचा जवळपास 53,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा जवळपास 58,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. चांदी प्रति किलो 72 हजार रुपयावर गेली आहे.

