नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बुधवारी 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर केला. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विविध क्षेत्रांसाठी मोठ्या आणि महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. ज्यामुळे पॅन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे
यामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलेल्या नव्या घोषणेनुसार, पॅनकार्डचा वापर आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ओळखपत्र म्हणून केला जाणार आहे. परमनंट अकाउंट नंबर (PAN) आता सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल सिस्टमसाठी एक सामान्य ओळखपत्र म्हणून वापरता येईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.