GOD येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतातहे आपण जाणून घेणार आहोत ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो, जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला, त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला आहे
जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.
Christmas Festival
ख्रिसमस’ हे नाव मास ऑफ क्राइस्ट (किंवा येशू) वरून आले आहे. एक सामूहिक सेवा (ज्याला कधीकधी कम्युनियन किंवा युकेरिस्ट म्हणतात) जिथे ख्रिस्ती आठवतात की येशू मरण पावला आणि नंतर पुन्हा जिवंत झाला. ‘ख्रिस्त-मास’ सेवा ही एकमेव अशी होती जी सूर्यास्तानंतर (आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी) करण्याची परवानगी होती, म्हणून लोक मध्यरात्री होते! म्हणून आपल्याला ख्रिस्त-मास हे नाव ख्रिसमस असे लहान केले जाते.
येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही! बायबलमध्ये कोणतीही तारीख दिलेली नाही, मग आपण ती 25 डिसेंबरला का साजरी करतो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची निश्चित तारीख कुणालाच माहीत नाही किंवा कोठेही त्याची तशी नोंद नाही. जरी हा दिवस अनिश्चित असला तरी साधारणपणे हे मान्य केले जाते की येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकामध्ये साधारणपणे सहा ते चार या कालावधीमध्ये झाला होता. (6- 4 Th B.C.) ख्रिस्तानंतरच्या चवथ्या शतकात (4th A.D.)