पालघर,(प्रतिनिधी)- देशासह राज्यभरातील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांना पालघर येथील माहीम येथून एक धक्कादायक खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे,एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सामूहिक अत्याचाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या काळात तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला याप्रकरणी ८ तरुणांना सातपाटी पोलिसांनी अटक केली आहे.
मित्रानेच केला विश्वासघात….
अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारात पीडित मुलीच्या मित्राचा हात असल्याचे उघड झाले आहे.मित्रानेचं पालघर तालुक्यातील माहीम परिसरातील पाणेरीनजीक १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका निर्जनस्थळी नेले. त्यानंतर आठजणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.
पीडितीने गाठले पोलीस स्टेशनं….
अत्याचारानंतर पीडित मुलीने माहीम पोलीस ठाणे गाठले. तिने झाल्या प्रसंगाची पोलिसांना माहिती देत आठ जणांविरोधात तक्रार नोंदवली. सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या माहीम चौकी दुरक्षेत्रात माहीम परिसर येतो. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या बंगल्यात आणि जवळील झाडीत या पिडीत अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार करण्यात आला. सर्वप्रथम या मुलीला तिच्या मित्राने या ठिकाणी बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने आठ जणांनी अत्याचार केले.