मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर विरोधकांकडून शिंदे गटावर ५० खोक्यांचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने यावरून विरोधक टीका करताना आपण पाहिलं आहे. यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला असून जे कोणी नेते ५० खोक्यांचा आरोप करतील त्याची आरोप सिद्ध करावे अथवा त्यांच्यावर २५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला जाणार आहे असा इशारा शिंदे गटाचे नवनिवार्चित प्रवक्ते विजय शिवतारे यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधकांकडून सातत्याने शिंदे गटावर गद्दार, खोके असा आरोप केला जात आहे. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळेच अखेर शिंदे गट आक्रमक झाला असून आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.