मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले असून शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे व शिवसेनेला धक्यावर धक्के बसू लागले आहेत. अशात आता गोंदिया पूर्व विदर्भ येथील ठाकरे गट एकनाथ शिंदे गटाने फोडला आहे. या भागातील युवासेनेचे 7 जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेशात समावेश असणार आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वजण शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. यामध्ये हर्षल शिंदे, शुभम नवले, रोशन कळंबे, दिपक भारसागडे, कगेश राव, नेहा भोकरे, सोनाली वैद्य या युवासेनेच्या महत्वाच्या जिल्हाप्रमुखांचा समावेश आहे.
हे सुद्धा वाचा..
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर..
Jalgaon news ; जळगावकरांना ‘या’ वेळेला पाहता येणार ‘खंडग्रास चंद्रग्रहण’
अंजीर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीय का? नसेल तर आताच जाणून घ्या
टपाल खात्यात 10वी, 12वी पाससाठी नोकरीची मोठी संधी.. 81100 पर्यंत पगार मिळेल
शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी आज सर्व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाला विदर्भात खिंडार पडले आहे.