जळगाव,(प्रतिनिधी)- देशात प्रथमच संपूर्ण चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेशात दिसणार आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे तर इतर ठिकाणी आंशिक चंद्रग्रहण दिसेल. 08 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चंद्र उगवताच त्याच वेळी भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण संध्याकाळी 6.19 वाजता संपेल,दरम्यान आज मंगळवारी दिनांक ८ रोजी सायंकाळी पूर्व दिशेला खंडग्रास चंद्रग्रहण ही अदभुत खगोलीय घटना जळगावकरांना बघायला मिळणार आहे.
आज दिसणारे हे खग्रास चंद्रग्रहण आहे. मात्र, याची सुरवात भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी एक वाजून ३२ मिनिटांनी उत्तर अमेरिकेतून होणार आहे. त्या वेळी आपल्याकडे चंद्रोदय होतो, तोपर्यंत ग्रहण सुटायला लागलेले असेल. त्यामुळे आपल्या भागात ते २५ टक्केच खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे. गेल्या २५ ऑक्टोबरला झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणावेळी ग्रहण स्थितीतच सूर्यास्त झाला होता. या वेळी सायंकाळी पाच वाजून ४६ मिनिटांनी चंद्रोदय ग्रहण लागलेल्या स्थितीतच होणार आहे. पाच वाजून ५७ मिनिटांनी चंद्र २५ टक्के ग्रासलेल्या स्थितीत बघता येईल.
शहरातील मेहरून तलाव परिसरात बघण्याची व्यवस्था
मराठी विज्ञान परिषद, जळगाव विभाग व मराठी प्रतिष्ठानतर्फे मंगळराी सायंकाळी पाच वाजून ३० मिनिटांपासून मेहरूण तलाव परिसरात खंडग्रास चंद्रग्रहण बघण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी तीन टेलिस्कोप लावण्यात येणार आहेत. हा ऊन-सावल्यांचा खेळ असून, ग्रहण निसर्गाचा अदभुत चमत्कार आहे. तरी सर्वांनी मनात कोणतेही समज-गैरसमज न ठेवता या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.
15 दिवसांच्या अंतराने हे दुसरे ग्रहण असेल, त्यापूर्वी 25 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण झाले होते. हे चंद्रग्रहण भारतात दिसू शकते, त्यामुळे ग्रहणाचा सुतक कालावधी वैध असेल. चंद्रग्रहणातील सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्यापूर्वी 9 तास घेईल. संपूर्ण चंद्रग्रहण भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये दिसणार आहे. भारताशिवाय 8 नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पॅसिफिकमध्ये दिसणार आहे.