पोस्ट विभागमध्ये पोस्टल सर्कलमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), पोस्टमन, पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटसह विविध पदांसाठी भरती निघाली आहे. dopsportsrecruitment.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अंतिम दिनांक 22 नोव्हेंबर 2022 पूर्वी स्वतःची नोंदणी करावी. विभाग शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी तयार करेल जी 06 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि आसाम विभागांसाठी अधिसूचनाही लवकरच वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट – 12वी पास. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान 60 दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
पोस्टमन/मेल गार्ड – १२वी पास आणि स्थानिक भाषेचे ज्ञान. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान 60 दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
एमटीएस – 10वी पास आणि स्थानिक भाषेचे ज्ञान अर्थात गुजराती.
पगार
पोस्टल असिस्टंट आणि शॉर्टनिंग असिस्टंट या पदांवर नोकरी मिळवणाऱ्यांना 25,500 ते 81100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
पोस्टमन/मेल गार्डच्या पदावर नोकरी मिळवणाऱ्यांना 21,700 रुपये ते 69100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
एमटीएसच्या पदावर नोकरी मिळवणाऱ्यांना 18000 ते 56900 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
हे पण वाचा :
मुंबई पोलीस शिपाई पदाच्या ७०७६ जागासाठी भरती ; असा करा अर्ज, जाणून घ्या पात्रता
युवकांसाठी खुशखबर.. राज्य राखीव पोलीस बल धुळे आस्थापनेवरील भरतीची जाहिरात प्रकाशित
कृषि विज्ञान केंद्रात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी…पगार 67000
वेस्टर्न कोलीफिल्ड लि.नागपूर येथे 900 जागांसाठी बंपर भरती, ITI पाससाठी सुवर्णसंधी..
अर्ज कसा करावा?
उमेदवार दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अधिकृत वेबसाइट अर्थात dopsportsrecruitment.in वर ऑनलाइन मोडद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
भारतीय डाक भर्ती 2022 नोटिफिकेशन