नाशिक : नाशिकमधील प्रेमीयुगलने गोव्यात जाऊन टोकाचं पाऊल उचललं. घरच्यांनी लग्नाला प्रखर विरोध केल्याने प्रेमीयुगालांनी गोव्यात जाऊन लग्न करण्याचा निर्धार केला होता. मात्र गोव्यात गेल्यावर दोघांनी निर्णय बदलला. प्रेमीयुगालांनी थेट आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात दोघांनी विषप्राशन केले होते त्यात 21 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून मुलीची प्रकृती स्थिर आहे. तिच्यावर गोव्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, याबाबत गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून ही घटना घडल्यानंतर नाशिकमधील प्रेमी युगलांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला असून याबाबत कल्पना दिली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
नाशिक येथील गौरव यादव या 21 वर्षीय तरुणाचे एका 22 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांनी कडाडून विरोध केला होता.घरच्यांचा विरोध पाहून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गेल्या आठवड्यात ते रेल्वेने नाशिकहून गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी लग्न न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता.
मुलाच्या मृत्यूनंतर तरुणीने गोव्यातील कोलवा पोलिसांना जबाबात ही माहिती दिली असून कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा हे तपास करीत आहे.
हे पण वाचा :
चोरट्यांचा धुमाकूळ ; चितोडा येथे दुकानाबाहेर लावलेले वाहन लांबविले, चोरटे CCTV मध्ये कैद
२५ वर्षीय नराधमाचा ५ वर्षाच्या चिमुरडीवर भयंकर पद्धतीने अत्याचार
आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांनी संयम ठेवा, लवकरच चांगले परिणाम मिळतील
अल्पवयीन मुलीशी मैत्री करून जबरी अत्याचार, भुसावळमधील धक्कादायक घटना
दरम्यान, नाशिक पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली असून मुलाचा मृतदेह घेण्यासाठी त्याचे नातेवाईक गोव्यात दाखल झाले आहे. याशिवाय मुलीचे नातेवाईक देखील मुलीवर ज्या रुग्णालयात दाखल आहे तिथे पोहचले आहेत. कोलवा पोलीसांनी याबाबत याबाबत गुन्हा दाखल केला आहे.