चितोडा, ता. यावल : जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडीसह वाहन लांबविण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. अशातच यावल तालुक्यातील चितोडा येथे दुकानाबाहेर लावलेले छोटा हाती वाहन चोरट्यांनी लांबवीले आहे. प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
चितोडा येथील सातपुडा कृषी केंद्राबाहेर प्रशांत निवृत्ती धांडे यांच्या मालकीचे छोटा हाती वाहन (क्रमांक एमएच.१९-एस.९७७५) उभे केले होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात भामटे वाहनाजवळ आले. त्यातील एकाने बनावट चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. नंतर वाहन घेऊन पसार झाले.
हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला. दरम्यान, एका दुचाकीवर तीन जण चितोडा गावात आल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यांनी अंधारात दुचाकी लावली. एक जण दुचाकीवर होता, तर दोघे छोटा हत्तीजवळ आले. दोन वाहनात व एक दुचाकीवर झाला पसार झाला. दरम्यान, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत पाहताना मध्यरात्री २.३० मिनिटांनी चोरटा आला व त्याने वाहनाचा दरवाजा उघडला. यानंतर वाहन चितोडा येथून यावलमार्गे चोपड्याच्या दिशेने निघाल्याचे दिसत आहे.