जळगाव : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतुर्वखाली शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली होती. या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा झटका बसला होता. यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहे. शिवसेना फुटल्यानंतर एकाच घरात दोन गट पडल्याचं दिसून आलं. ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झालेल्या घरांना दिवाळीने मात्र पुन्हा एकत्र आणलंय.
आज देशभरात भाऊबीज सण साजरा केला जात आहे. यानिमित्त शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ठाकरे गटात असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी भाऊबीज सणानिमित्त भेट दिली. बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन आमदार किशोर पाटील यांनी भाऊबीज साजरी केली.
हे पण वाचा :
शिंदे गटाला लागणार ग्रहण? राष्ट्रवादीच्या दाव्याने राजकारणात उडाली खळबळ
बाप-लेकाची एकाच दिवशी निघाली अंत्ययात्रा ; पाचोरा तालुक्यातील घटना
जळगाव शहर पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले ; दोन गटात झालेल्या वादात तरुणाचा खून
पोस्ट विभागमध्ये विनापरीक्षा थेट नोकरीची संधी..10वी, 12वी उत्तीर्णांना मिळेल 69100 पगार
लाडका भाऊ भाऊबिजेला घरी आल्यानं वैशाली सूर्यवंशी यांनी देखील राजकीय मतभेद बाजूला ठेवले. त्यांनी लडक्या भाऊरायाचं मनोभावे औक्षण केलं. आणि दोघांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटलं की, आजच्या दिवशी आमच्या दोघांच्या मनात राजकारणाचा थोडासुद्धा विचार येत नाही. आमचे वैचारीक मतभेद असतीलही, पण आजच्या दिवसासाठी आम्ही ते बाजूला ठेवून एकत्र भाऊबीज साजरी करतो आहोत, असंही त्यांनी म्हटलं.