जळगाव | जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसतेय. दरम्यान, जळगाव शहरात पुन्हा तरुणाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दोन गटात झालेल्या वादात एकाचा खून झाला आहे. तांबापुरा परिसरात ही घटना घडली असून तिघे जखमी झाले आहेत. संजय सिंग प्रदीप सिंग असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच एम.राजकुमार यांनी पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक जिल्ह्याची माहिती घेत नाही तोच रात्री दोन गटात झालेल्या वादात एकाचा खून झाला आहे.
यात संजय सिंग प्रदीप सिंग या तरूणाच्या वर्मी घाव लागल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, त्याची प्राणज्योत मालवली. तर याच हल्ल्यात संजय सिंग याचे वडील प्रदीप सिंग तसेच अन्य चार सदस्य जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यासोबत अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी सहकार्यांनीही दुर्घटना स्थळाची पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.