पाचोरा | पाचोरा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आलीय. तालुक्यातील वणगाव मुलाणे येथील पिता आणि पुत्राचा एकाच वेळेस अंत्ययात्रा निघाली. ऐन दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी काय आहे घटना?
वडगाव मुलाणे येथील लालसिंग पंडित पवार हे आपल्या कृष्णा या मुलासोबत दिवाळीच्या दिवशी शेतामध्ये गेले होते. शेतातून परत येत असतांना कृष्णाचा पाय घसरून तो नदीत पडला. यामुळे लालसिंग पवार यांनी देखील नदीत उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही पोहता येत नसल्याने नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाला.
हे पण वाचा :
जळगाव शहर पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले ; दोन गटात झालेल्या वादात तरुणाचा खून
पोस्ट विभागमध्ये विनापरीक्षा थेट नोकरीची संधी..10वी, 12वी उत्तीर्णांना मिळेल 69100 पगार
फटाका फोडताना मुलासोबत घडला धक्कादायक प्रकार ; पहा हा VIDEO
ऐन दिवाळीच्या दिवशीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली. दोन्ही बाप-लेकाच्या पार्थिवावर काल सकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांनी मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.