मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर गिरीश महाजन यांची झेडपी परीक्षेसंदर्भात एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लीपच्या सत्यतेबाबत नजरकैद पुष्टी करत नाही. या व्हायरल क्लीपमुळे विरोधकांकडून महाजन यांच्यावर टीका केली जात आहे. सोबतच विद्यार्थी संघटना देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
आता यावरूनच मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. रोजगारासाठी प्रश्न विचारणाऱ्या युवकांचा आवाज दाबण्याची असुरी शक्ती तुम्हाला कुठून आली?, असा टोला विनोद पाटील यांनी लगावला आहे.
हे सुद्धा वाचा..
अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंचं फडणवीसांना खुलं पत्र, केली ही मागणी
सुसाईड नोट लिहून टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, हिंदी सिनेमासृष्टी हादरली
महावितरणमध्ये बंपर भरती ; 10वी, ITI पाससाठी संधी.. त्वरित अर्ज करा
VIDEO : मला गुलाबभाऊ म्हणून मर्यादित राहायचं नाहीय तर.. ; गुलाबराव पाटलांचे मोठे विधान
याबाबत विनोद पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे जबाबदार मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषद भरतीसंबंधी केलेल्या अर्वाच्य वक्तव्याचा जाहीर निषेध. सरकार कोणाचे असो आम्हाला फक्त नोकरी द्या या एकाच आकांत भावनेतून आजचा युवक नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र असे असताना त्याचे दुःख, त्याच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही. त्यामुळे इतक्या असंवेदनशील मनाचा निषेध करावा तितका थोडाच. जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये 13 हजार 521 जागांसाठी जवळपास 13लाख परीक्षार्थींनी अर्ज केले. या परीक्षार्थीकडून 25 कोटी 87 हजार रुपये आपल्या सरकारने जमा केले. मग परीक्षा कधी असे विचारल्याचा इतका राग का?, असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे.