सोलापूर : ऐनवेळी प्रियकर किंवा प्रेयसीकडून लग्नास नकार मिळाल्यावर अनेकजण नैराश्यात जातात. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना हे सगळं सहन होत नाही आणि ते टोकाचं पाऊल उचलतात. लग्नास नकार मिळाल्याने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशातच आता सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
आमचे प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहत प्रेमीयुगुलांनी आपले जीवन संपवले. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांनी हे टोकाचे का पाऊल उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मागील वर्षीच गणेश विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेले वाजीद चांद इनामदार अशी प्रेमीयुगुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी 7 वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
हे सुद्धा वाचा..
एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा धक्कादायक दावा, म्हणाले..
काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी, दोघांनी पळून जाऊन केलं लग्न पण.. नंतर घडलं भयानक
भारतीय पोस्टात 8वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स.. तब्बल 63,000 रुपये पगार मिळेल
दरम्यान, या दोघांनी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… म्हणून हे कृत्य आम्ही करत आहोत, याबाबत कोणासही जबाबदार धरू नये, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करत आहेत.