मुंबई : मागील महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका शिंदे – फडणवीस सरकारने सुरूच ठेवला आहे. आता अशातच शिंदे, फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला 850 कोटी रुपयांचा निधी शिंदे – फडणवीस सरकारकडून रोखण्यात आला आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. यावरून आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
पवार, मुश्रीफ यांना धक्का
शिंदे, फडणवीस सरकारने विविध विकास कामांसाठी असलेला 850 कोटी रुपयांचा निधी रोखला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हे सुद्धा वाचा..
धक्कादायक ! चिठ्ठी लिहत प्रेमीयुगुलाने संपविले जीवन*
एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा धक्कादायक दावा, म्हणाले..
काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी, दोघांनी पळून जाऊन केलं लग्न पण.. नंतर घडलं भयानक
भारतीय पोस्टात 8वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स.. तब्बल 63,000 रुपये पगार मिळेल
विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
सत्तेत आल्यापासून फडणवीस, शिंदे सरकारकडून महाविकास आघाडीच्या काळातील योजनांना स्थगिती देण्याचा धडाका सुरु करण्यात आला आहे. विरोधकांनी यावरून अनेकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामध्ये आता 850 कोटी रुपयांचा निधी रोखल्याने राष्ट्रवादीसह अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जात आहे.