जळगाव : जळगावात पती-पत्नी और ओ… असा काहीसा प्रकार समोर आला आहे. कॉलेजच्या कामाच्या नावाने घरातून बाहेर पडलेल्या पतीला रेस्टॉरंटमध्ये प्रेयसीसोबत पत्नीनेच रंगेहाथ पकडले आहे. यानंतर संतापलेल्या पत्नीने दोघांना जागेवरच चोप दिला. त्यानंतर दोघांना पोलीस ठाण्यात हजरही केले. पोलिसांनी पत्नीची तक्रार दाखल करून घेत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा शिरसोली रस्त्यावरील एका महाविद्यालयात नोकरीला आहे. रविवारची सुट्टी असतानाही तो महाविद्यालयात जायचे असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. यानंतर पती महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये प्रेयसीसोबत नाश्ता करत बसला होता. याबाबतची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तिने भावाला सोबत घेत रेस्टॉरंट गाठत पत्नीने दोघांच्या कानशिलात लगावली.
हे पण वाचा :
..आता दिवाळी तरी गोड करा; शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
ठाकरेंची पुन्हा एकदा कोंडी? ‘त्या’ चिन्हांवर शिंदे गटाचाही दावा?
सोने-चांदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी.. आज तब्बल ‘इतक्या’ रुपयांची झाली घसरण, वाचाच नवीन दर
अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
निर्भया पथक स्पॉटवर दाखल होत सर्वांना एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात नेले. तिथे ठाणे अंमलदार रामकृष्ण पाटील यांनी पती- पत्नी आणि प्रेयसी असे तिघांचे म्हणणे ऐकून घेत प्रेयसीच्या आई- वडिलांनाही पोलीस ठाण्यात बोलावले.
प्रेयसीला तिच्या आई- वडिलांच्या तर प्रियकराला मेहुण्याच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेच्या संदर्भात पत्नीने पती व प्रेयसीविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास समाधान टहाकळे करीत आहेत.