हिंगोली : एका शेतकऱ्याच्या लहानग्याने मुलाने आपल्या परिवाराच्या वेदना मांडत चक्क मुख्यमंत्र्यांना पात्र लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे. काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे अशी भावनिक साद या चिमुरड्याने मुख्यमंत्र्यांना घातली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सहावीमध्ये शिकणा-या प्रतापने यावर्षी पावसामध्ये सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता. ढगफुटी व सततच्या पावसामुळे सर्वत्र शेतजमिनी खरडून गेली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा असताना सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. सणाला पोळ्या तर सोडा पैसेही नाहीत. तसेच जवळील जयपूर गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने पैसे मागितल्यामुळे वडीलांनी फाशी घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुखी ठेवावे आणि अनुदान लवकर द्यावे, अशी मागणीही या पत्रातून चिमूकल्याने केली आहे.
हे पण वाचा :
सोने-चांदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी.. आज तब्बल ‘इतक्या’ रुपयांची झाली घसरण, वाचाच नवीन दर
पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, 5100 रुपये जमा केल्यास मिळतील 19 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या?
धनुष्यबाण चिन्ह गोठवलं ; उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ ३ पर्याय?, आजच्या निर्णयाकडे लक्ष?
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन
हिंगोली जिल्ह्यातील जुन-जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक जमिनी खरडुण गेल्या तर काही जमिनीतील पिके पाण्यात गेली प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई झालेल्या देण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडे निधी देखील आला आहे, मात्र दसरा संपला आता दिवाळी आली तरी हा निधी वाटप करण्यात आला नाही. आता दिवाळीच्या आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.