सोलापूर,(महेश गायकवाड)-अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील ग्रामदैवत महाराष्ट्राचे महांत नागणसुरचे नंदादीप परमपूज्य बसवलिंगेश्वर महास्वामिजिंचे 90 वा पुण्यस्मरणदिन आज शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांने मोठ्या उत्साहात आनंदात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
प्रारंभी पहाटे सहा वाजता श्री. बसवलिंगेश्वर कर्तृ गददुगेश महारुद्राभिषेकाने प्रारंभ करण्यात आले.नंतर धर्म सभा होवून उपस्थित सर्व सदभक्ताना डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी अशिर्वचन केले.व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ,धैर्यशील मोहिते पाटील ,मोतीराम राठोड,महिबून मुल्ला,मल्लिकार्जुन पाटील,संजय शरणार्थी,गिरीमल्ल गंगोंडा, शशी कळसगोंडा,बसवराज नागलगांव,बाबासाहेब पाटील,नितीन नन्नवरे, मालिनाथ भासगी, धनराज धनशेट्टी, बसवराज गंगोडा, बसवराज मंठगी, मल्लिनाथ करपे, भीमशा धोत्री,समवेत गण्यमान लोकांच्या उपस्थितीत 59 सर्वधर्मीय सामूहिक विवाह लाखोंच्या उपस्थितीत पार पडले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 11000 पेक्षा जास्त सुहासिनीना ओटी भरण्यात आले,7000 पेक्षा जास्त जंगम गणाराधना करण्यात आले आणि लाखो भक्तांना तूप पुरण पोळीचे, खीर महाप्रसाद वितरण करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्रप्रदेश समवेत देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येत सद्भकत उपस्थित होते.संपूर्ण गांव बसवा….बसवा….. जय… जय बसवा,जगद्गुरु बसवलिंगेश्वर महाराज …की…जय… जयघोशाने परिसर दुमदुमला होते.
9.10.2022 रोजी सायंकाळी 5 वाजता बसवलिंग महास्वामिजिंच्या भावचीत्राचा आणि धर्मग्रंथांचा मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे.या मिरवणुकीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम बरोबर लेझिम,टिपरी,झांज,भजन,विविध सांस्कृतिक कला मंडळा कडून कलासंघ सहभागी होणार आहे.दोन्ही दिवशी सर्व सद्भक्तना महाप्रसादाचा व्यवस्था करण्यात आले आहे.गावातील प्रमुख युवक मंडळाकडून ठीक ठिकाणी अल्पोपहार व्यवस्था करण्यात आले आहे.
16 सप्टेंबर पासून गावात दर दिवशी बसवलिंगेश्वर महास्वामिजिंचे जीवन चरित्र पुराण,रक्तदान शिबिर,आधार कार्ड,बँक खाते काढणे,रांगोळी स्पर्धा,सारेगमप संगीत कार्यक्रम, जानपद कार्यक्रम संपन्न झाले आहे.विशेष म्हणजे नागणसुर गावातील चालक मालक संघटनेकडून पुण्यस्मरण कार्यक्रमाला येणाऱ्या भक्तांना सुमारे 175 पेक्षा जास्त वाहनाने नागणसुर ते अक्कलकोट,सोलापूर, हैद्रा, तोळनूर, गुरववाडी,नविदगी, माशाळ, करजगी,होसुर, मणूर,इंडी,अक्कलकोट स्टेशन, जेवूर आदी गावातून येणाऱ्या भक्तांना मोफत वाहन व्यवस्था करण्यात आले होते.तसेच बसवा ऑक्वा कडून मोफत पिण्याचे पाण्याची व्यवस्था केले होते.
कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य…
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे जगद्गुरु गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजीच्या 90 व्या पुण्यस्मरणोत्सव निमित्त लाखो भक्तांचा महासागर .
11 हजार सुहासिनींची ओटी भरणे
7 हजार जंगम तृप्ती
59 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा
लाखोहून जास्त उपस्थित भावीकांनी पुरणपोळीचा प्रसादाचा आस्वाद घेतला.
आलेल्या सर्व भक्तांना मोफत ने- आण करण्याची सोय चालक- मालक संघटनेना 175 वाहनामार्फत करण्यात आले.
105 रक्तदात्याने रक्तदान केले.